Google+ Followers

Wednesday, 23 January 2013

शिवरथ याञा - छञपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा 'किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड'


शिवरथ याञा - छञपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा 'किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड' शिवरथ याञा वर्षे ३ ( तिसरे ) छञपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा 'किल्ले शिवनेरी ते किल्ले रायगड' ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी २०१३ मरगळलेल्या मराठी मानसिकतेला हीच योग्य माञा । शिवरथ याञा, शिवरथ याञा || १) देशातील छत्रपती शिवरायांचा पहिला पालखी सोहळा. २) देशातील शिवरायांची पहिली धारकरयाची वारी. ३) शिवरायांच्या समाधीनंतर रायगडाच्या पायथ्यापासून म्हणजेच पाचाड पासून ३३० वर्षानंतर शिवरायांना पालखीतून रायगडावर घेवून जाणारी पहिली यात्रा. ४) शिवजन्मस्थळापासून ते शिवसमाधीपर्यंत शिवरायांना मोठ्या डौलात घेवून जाणारी पहिली यात्रा. ५) छत्रपती शिवरायांच्या कार्याचा जागर करणारी पहिली यात्रा. ६) शिव-शंभू चरित्राचा प्रसार शिवनेरी ते रायगड या प्रवासात येणाऱ्या गावात करणारी पहिली यात्रा. ७)शिवरायांनी रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ ज्यांच्या हस्ते करून घेतली त्याच जंगम समाजातील व्यक्तीकडून रायगडावर शिवरायांना अभिषेक करणारी ३३६ वर्षानंतरची पहिली यात्रा. ८) शिवरायांच्या समाधीनंतर महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकाच झेंड्याखाली आणणारी पहिली यात्रा. सर्व शिवभक्तानी लाखोंच्या संखेने उपस्थित राहावे. !! जय शिवराय !! जय गडकोट !! टीप: शिवरथ यात्रेत सहभागी होण्यासाठी कोणताही शुल्क आकारला जात नाही, जेवण व राहण्याची सोय संस्थे मार्फत केली जाते. शिवरथयात्रे दरम्यान सर्व नियोजित स्थळ, प्रसिद्ध इतिहासकारांची व्याख्याने, शिवकालीन मर्दानी प्रात्यक्षिके, शाहिरी पथक, ढोल ताशा पथक यांची सविस्तर माहिती दिली आहे. शिवरथ यात्रेची नियोजन पत्रिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. http://sahyadripratishthan.com/ShivRath-Yatra-2013.jpg नावनोंदणी संपर्क : सदानंद पिलाणे ७३८५२४३४०५ सचिन शेडगे ९७६२५६७७२९ प्रवीण शिर्के ९०९६१०४५९५ रोहित देशमुख ९८७०३३३३८२

No comments:

Post a Comment