14th ram ganesh gadkari karandak rajyastariy ekankika spardha 1st jan to 3rd jan A.B. Marathi Natya Parishad, Pimpri-Chinchwad
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी
चिंचवड शाखा व श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान आयोजित या
वर्षीची ‘कै.राम गणेश गडकरी करंडक राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा -
२०१३’ शुक्रवार दि. १ ते रविवार दि. ३ फेब्रुवारी २०१३ दरम्यान चिंचवड येथे
होणार आहेत. स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे. स्पर्धेत आजपर्यंत पुणे व
पिंपरी चिंचवड सह नागपूर, मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, पनवेल,
नाशिक, सोलापूर, औरंगाबाद यासारख्या ठिकाणांशिवाय हैदराबाद येथील
संघांनीही सहभाग नोंदविला आहे. कोणत्याही महाविद्यालयीन, हौशी, औद्योगिक,
बँक कर्मचारी, कार्यालये यासारख्या संघांना ही स्पर्धा खुली आहे. आधी
प्रवेशिका सादर करणाऱ्या एकूण ३० संघांनाच स्पर्धेत सहभागी होता येईल.
स्पर्धेसाठी असणारी प्रवेशिका व नियमावली नाट्य परिषदेच्या www.natyaparishadpimprichinchwad.com या संकेत स्थळावर तसेच परिषदेच्या कार्यालयात उपलब्ध असतील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघास आपली प्रवेशिका उशिरात उशिरा गुरुवार दि. २४ जानेवारी २०१३ पर्यंत सादर करावी लागेल. दि. २७ जानेवारी २०१३ रोजी स्पर्धेचे लॉटस् काढले जातील.
स्पर्धेत पहिल्या ३ व उत्तेजनार्थ २ एकांकिकांची पारितोषिकासाठी निवड केली जाईल. प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या संघास श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्रतिष्ठान पुरस्कृत ‘कै.राम गणेश गडकरी फिरता करंडक’ , सन्मान चिन्ह व रोख रु. १०,००१ चे पारितोषिक दिले जाईल. तसेच इतर पारितोषिक प्राप्त संघांना व दिग्दर्शन, स्त्री व पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत योजना, बाल कलाकार इ. पारितोषिक प्राप्त कलाकारांनाही सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके दिली जातील. स्पर्धेसाठी रु. ५०० प्रवेश शुल्क व अनामत, म्हणजे प्रयोग सादर केल्यावर परत मिळणारी रक्कम रु. ५०० आहे. याबाबतची संपूर्ण माहिती तसेच नियमावली प्रवेशिकेसोबत उपलब्ध आहे.
महाराष्ट्र व जवळच्या राज्यातील कोणताही संघ आपली प्रवेशिका सादर करू शकेल. स्पर्धेबाबत अधिक माहिती साठी कृपया किरण येवलेकर ( ९०२८० ५६८५८ ), नरेंद्र आमले ( ९८२२५ ५४०१८ ), गौरी लोंढे ( ९९२३६ ८०८१९ ) व राजेंद्र बंग ( ९८२२३ १३०६६ ) यांचेशी संपर्क साधावा.
भाऊसाहेब भोईर,
अध्यक्ष, अ. भा. मराठी नाट्य परिषद,
पिंपरी चिंचवड शाखा.

No comments:
Post a Comment